हरवलेल्या दातांसाठी डेंटल इम्प्लांट (Dental Implant) का सर्वोत्तम पर्याय आहे?
Smilex Dental Implants and Aligners Centers येथे डॉ. विजय देशमुख (33+ वर्षांचा अनुभव) यांच्या मार्गदर्शनाखाली डेंटल इम्प्लांट्सद्वारे हजारो पेशंट्सना नैसर्गिक आणि आत्मविश्वासपूर्ण स्माइल मिळाली आहे. हरवलेले दात हा केवळ सौंदर्याचा प्रश्न नसून, तो खाणे, बोलणे आणि एकूणच ओरल हेल्थवर परिणाम करतो. या समस्येचा कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाय म्हणजे डेंटल इम्प्लांट्स.
डेंटल इम्प्लांट(Dental Implant) म्हणजे काय?
जेव्हा दातांच्या कमतरतेला कुत्रिम दातांनी भरलं जात त्या प्रक्रियेला डेंटल इम्प्लांट म्हणतात . डेंटल इम्प्लांट हा एक छोटा टायटॅनियम स्क्रू असतो जो जबड्याच्या हाडात बसवला जातो. तो नैसर्गिक दाताच्या मुळासारखे काम करतो. त्यावर क्राउन (दाताचा वरचा भाग) बसवून पूर्ण दात तयार केला जातो.
हरवलेल्या दातांमुळे होणाऱ्या समस्या
- नीट चावता येत नाही
- बोलताना अडचण
- चेहऱ्याचा आकार बदलणे (sunken look)
- जवळचे दात हलणे किंवा वाकणे
- हाडाची झीज (Bone Loss)
या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणजे डेंटल इम्प्लांट्स.
डेंटल इम्प्लांट (Dental Implant) का सर्वोत्तम पर्याय आहे?
1. नैसर्गिक दातांसारखा लूक आणि फील
इम्प्लांट्स दिसायला आणि वापरायला पूर्णपणे नैसर्गिक दातांसारखे असतात. त्यामुळे स्माइल अधिक आकर्षक दिसते.
2. दीर्घकालीन आणि टिकाऊ उपाय
योग्य काळजी घेतल्यास डेंटल इम्प्लांट्स 15–25 वर्षे किंवा त्याहून अधिक टिकू शकतात.
3. जबड्याच्या हाडाचे संरक्षण
इम्प्लांट हाडात बसवल्यामुळे हाडाची झीज थांबते, जी इतर पर्यायांमध्ये होत राहते.
4. शेजारच्या दातांना नुकसान नाही
ब्रिजमध्ये शेजारचे दात घासावे लागतात, पण इम्प्लांटमध्ये ते सुरक्षित राहतात.
5. खाणे आणि बोलणे सुधारते
कडक पदार्थही सहज चावता येतात आणि स्पष्ट बोलता येते.
6. काढण्याची गरज नाही
डेंचरप्रमाणे इम्प्लांट काढावे लागत नाहीत, ते कायमस्वरूपी बसवलेले असतात.
डेंटल इम्प्लांट्स ची किंमत (Dental Implants Cost) कशावरून ठरते?
जेव्हा आपण इम्प्लांट साठी तुमचा स्कॅन करून घेतो तेव्हा स्कॅन बघितल्यानंतर त्यानुसार उपलब्ध आकारमानानुसार आपण इम्प्लांट चा प्रकार ठरवतो. कोणत्या प्रकार चा इम्प्लांट किती साईझ चा इम्प्लांट त्यानुसार कोणता इम्प्लांट आपल्यासाठी परफेक्ट राहील ते ठरवलं जात. सगळ्यात महत्वाचं इम्प्लांट ची कंपनी कोणती आहे ब्रँड कोणता आहे यावर आपल्या इम्प्लांट ची किंमत (Implant Cost) ठरते. इम्प्लांटच्या ट्रीटमेंट मध्ये याशिवाय अजूनही काही गोष्टी असतात म्हणजे जस कि वरचा दात असेल तर बोन ग्राफ्ट करायला लागणार असेल तर ते बोन कमी असेल तर अधिक काही ग्राफ्टिंग प्रकिया लागणार असतील तर त्या, पुढचा दात असेल तर कधी कधी हास्या मध्ये येणाऱ्या हिरडी च्या रचना त्या ट्रीटमेंट यावरून डेंटल इम्प्लांट्स ची किंमत ठरते. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इम्प्लांट करून घेणाऱ्या डॉक्टरांचा अनुभव.
डेंटल इम्प्लांट्स (Dental Implants) किती वर्षे टिकतो?
सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे इम्प्लांटच जे फिक्सचर आहे ते थेट आपल्या जबड्यात जाऊन बसवलेलं असत. ते जे फिक्सचर आहे, डेंटल इम्प्लांट्स आहे, ते बनवलेलं असत टायटॅनियम नावाच्या धातूपासून तर हे धातू अत्यंत कठीण आहे हे बीओकॅम्पॅटिबल मटेरियल आहे जे आपण आपल्या शरीर मध्ये बिनधास्त कुठेही बसवण्यासाठी वापरू शकतो फ्रॅक्चर (हाड मोडणे) झाल्यानंतर ज्या प्लेट्स बसवल्या जातात त्या सुद्धा टायटॅनियम च्या असतात. मेडिकल ग्रेड चा जो टायटॅनियम आहे त्या मेटालचा हा इम्प्लांट असतो त्याला आपण कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरीही तो तुटत नाही म्हणून तो तुटून जण मोडणं याची शक्यता फारच कमी असते. तर मग काय होऊ शकत हा जो इम्प्लांट आहे तो आपल्या हाडांमध्ये बसलेला आहे इम्प्लांट च्या आजूबाजूला असत बोन म्हणजेच मांस हे जे मांस जोपर्येंत व्यवस्थित घट्ट व्ययस्थित नीट मजबूत आहे तोपर्येंत आपला इम्प्लांट तिथे व्यवस्थित राहणार आहे.
तर आता हे हाड जात कधी? किंवा त्याला काय प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते? जेव्हा हाडाची घनता (डेन्सिटी) सुसंगता (consistancy) कमी होत जाते, ठेवा ते हाड निस्तेज होत आणि हळूहळू कमी होऊ लागत त्यामुळे आपला इम्प्लांट हळूहळू सैल होण्याची शक्यता निर्माण होते, जर हाड निघून गेलं तर.
हाड (Bone) कधी जाऊ शकत?
जर हाडाला काहीतरी टोचल्यासारखं होत असेल अस्वछ राहील असेल तिकडे काहीतरी अडकून राहिलाय, हिरडी लाल झाली सूज आलीय, पु झाला असेल असेल आणि ते तसेच राहील तर हाड खराब व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू आपला इम्प्लांट निघून जातो. तर ज्यांचं नॉर्मल रेग्युलर पेशंट आहे ज्यांचं हाड सॉफ्ट होण्याची काही शक्यता नाही किंवा डायबेटिक पेशंट आहे सुद्धा जे शुगर व्यवस्थित ठेवतात त्या सर्वांच्या हाडाला सहसा काहीही होत नाही जर का तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर.
तर आता हि काळजी घेणं म्हणजे काय?
इम्प्लांट च्या आजूबाजूची जी हिरडी आहे ती छान स्वच्छ ठेवली पाहिजे. तिथे बॅक्टरीया चा प्रादुर्भाव खूप जास्त बॅक्टरीया साठलेत असं काही चालणार नाही तर त्यासाठी आपल्याला ते स्वच्छ ठेवायला हवं जस आपल्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सूचना पाळल्या तर आपल्या इम्प्लांट ला काहीही होत नाही.
अजून एक म्हणजे साधं रेगुलर जेवण तर किहीही आपण सहज खाऊ शकतो त्याच साठी आपण इम्प्लांट करून घेतो पण अतिशय कडक अश्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. चणे, शेंगदाणे, अक्रोड, बदाम आपण सहज खाऊ शकतो पण एखादा कडक खडा, सालीसोबत अक्रोड अश्या अतरंगी गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. अश्या गोष्टी ज्यामुळे आपल्या ओरिजिनल नॅच्युरल दातांना खराब करतात अश्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत त्यामुळे आपला इम्प्लांट लवकर खराब होणार नाही. आपलं रुटीन रेगुलर जेवण आपण बिनधास्त खाऊ शकतो.
इम्प्लांट करून घेतला कि मह्त्वाचा मुद्दा म्हणजे रेगुलर फॉलोऊप्स (checkup) ज्यामध्ये आपण बाईट ववस्थित आहे कि नाही आजूबाजूचे दात नीट आहेत कि नाही हे चेक करतो. आजूबाजूच्या हाडाची, हिरड्याची व्यवस्थित तपासणी होते. आपल्याला जर का तिथे डेपोसिट्स दिसले तर, डेपोसिट्स म्हणजे बॅक्टरीया च घर. ते डेपोसिट्स आपल्याला अजिबात इम्प्लांट च्या भोवती ठेवायचे नाहीत वेळीच ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण फेरतपासणीत तपासू शकतो. यासाठी इम्प्लांट करून घेतल्यानंतर सहा महिने किंवा एक वर्ष यामध्ये एक चेकअप करून घेणे आवश्यक आहे.
इम्प्लांट बसवल्यानंतर योग्य स्वच्छता, देखभाल आणि नियमित तपासणी केल्यास तुमचा इम्प्लांट दीर्घकाळ टिकू शकतो आणि कार्यक्षम राहू शकतो. याच कारण असं आहे इम्प्लांट हा हाडांमध्ये आहे जोपर्येंत हाड आहे तोपर्येंत इम्प्लांट आहे.
डेंटल इम्प्लांट vs ब्रिज vs डेंचर
| पर्याय | टिकाऊपणा | आराम | नैसर्गिक लूक | हाडाचे संरक्षण |
| इम्प्लांट | ⭐⭐⭐⭐⭐ | ⭐⭐⭐⭐⭐ | ⭐⭐⭐⭐⭐ | ✔️ |
| ब्रिज | ⭐⭐⭐ | ⭐⭐⭐ | ⭐⭐⭐ | ❌ |
| डेंचर | ⭐⭐ | ⭐⭐ | ⭐⭐ | ❌ |
डेंटल इम्प्लांट प्रक्रिया (Step-by-Step)
- तपासणी आणि एक्स-रे/CBCT स्कॅन
- इम्प्लांट बसवणे (Surgery)
- Healing Period (3–6 महिने)
- क्राउन बसवणे (Final Tooth)
Smilex मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून ही प्रक्रिया सुरक्षित आणि वेदनारहित केली जाते.
Smilex Dental Implants and Aligners Centers Pune मध्ये इम्प्लांट का करावे?
- 33+ वर्षांचा अनुभव – डॉ. विजय देशमुख
- अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान
- उच्च दर्जाचे इम्प्लांट मटेरियल
- वैयक्तिक ट्रीटमेंट प्लॅन
- हजारो यशस्वी केस
डेंटल इम्प्लांट्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा!
कोणासाठी योग्य आहे डेंटल इम्प्लांट?
- एक किंवा अधिक दात हरवलेले असलेले व्यक्ती
- पूर्ण दात नसलेले (Full Mouth Implants)
- डेंचर वापरण्यात अडचण असलेले
- चांगली ओरल हेल्थ असलेले
इम्प्लांटनंतर घ्यायची काळजी
- दररोज ब्रश आणि फ्लॉस करणे
- स्मोकिंग टाळणे
- नियमित डेंटल चेकअप
- कठीण पदार्थ टाळणे (सुरुवातीला)
FAQs – डेंटल इम्प्लांट संबंधित प्रश्न
1. डेंटल इम्प्लांट दुखतात का?
नाही. लोकल अॅनेस्थेसियामुळे प्रक्रिया जवळजवळ वेदनारहित असते.
2. इम्प्लांट बसवण्यासाठी किती वेळ लागतो?
सर्जरी 30–60 मिनिटांत पूर्ण होते, पण पूर्ण प्रक्रिया 3–6 महिने लागू शकते.
3. इम्प्लांट किती वर्ष टिकतात?
योग्य काळजी घेतल्यास 20+ वर्षे किंवा आयुष्यभर टिकू शकतात.
4. डायबिटीज असलेल्या पेशंट्सना इम्प्लांट करता येतात का?
हो, पण शुगर कंट्रोलमध्ये असणे आवश्यक आहे.
5. इम्प्लांट आणि ब्रिजमध्ये काय फरक आहे?
इम्प्लांट हाडात बसतो आणि शेजारच्या दातांना नुकसान होत नाही, तर ब्रिजमध्ये शेजारचे दात घासावे लागतात.
6. इम्प्लांटनंतर काय खावे?
सुरुवातीला सॉफ्ट फूड (उदा. खिचडी, दही) खावे.
7. वयाची मर्यादा आहे का?
18 वर्षांनंतर कोणत्याही वयात इम्प्लांट करता येतो.
निष्कर्ष
हरवलेल्या दातांसाठी डेंटल इम्प्लांट्स (Dental Implant) हा सर्वात सुरक्षित, टिकाऊ आणि नैसर्गिक उपाय आहे. जर तुम्हाला तुमचे स्माइल आणि आत्मविश्वास परत मिळवायचा असेल, तर Smilex Dental Implants and Aligners Centers Pune मध्ये आजच कन्सल्टेशन बुक करा.
कॉल/WhatsApp: +91 97654 07660