पडलेल्या दातांसाठी डेंटल इम्प्लांट(Dental Implant) का सर्वोत्तम पर्याय आहे?
Smilex Dental Implants and Aligners Centers Pune येथे डॉ. विजय देशमुख (३३+ वर्षांचा अनुभव) यांच्या मार्गदर्शनाखाली डेंटल इम्प्लांट्ससाठी हजारो रुग्णांना नैसर्गिक आणि आत्मविश्वासपूर्ण स्माइल मिळाली आहे. पडलेले, खुडलेले किंवा किडलेले दात हे केवळ सौंदर्याचा प्रश्न नसून चावणे, बोलणे आणि एकूणच ओरल हेल्थवर परिणाम करतात. या समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाय म्हणजे डेंटल इम्प्लांट्स.
डेंटल इम्प्लांट(Dental Implant) म्हणजे काय?
जेंव्हा पडलेल्या दातांच्या जागी, कृत्रिम दात बसवण्याच्या प्रक्रियेला डेंटल इम्प्लांट म्हणतात. डेंटल इम्प्लांट हा टायटॅनियमचा एक छोटा स्क्रू असतो, जो जबड्याच्या हाडात बसवला जातो. तो नैसर्गिक दाताच्या मुळासारखा कार्य करतो. त्यावर क्राउन (दाताचा वरचा भाग) बसवून पूर्ण दात तयार केला जातो.
गमावलेल्या दातांमुळे होणाऱ्या समस्या
· नीट चावता येत नाही
· बोलताना अडचण येते
· चेहऱ्याचा आकार बदलतो (खोल गेलेला दिसतो)
· शेजारचे दात हलतात वेडे वाकडे होतात
· हाडांची झीज (Bone Loss) होते
या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणजे डेंटल इम्प्लांट्स.
डेंटल इम्प्लांट हा सर्वोत्तम पर्याय का आहे?
1. नैसर्गिक दातांसारखा लूक आणि फील
इम्प्लांट्स दिसायला आणि वापरायला पूर्णपणे नैसर्गिक दातांसारखे असतात. त्यामुळे स्माइल अधिक आकर्षक दिसते.
2. दीर्घकालीन आणि टिकाऊ उपाय
योग्य काळजी घेतल्यास डेंटल इम्प्लांट्स १५–२५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकतात.
3. जबड्याच्या हाडांचे संरक्षण
इम्प्लांट हाडात बसवल्यामुळे हाडांची झीज थांबते, जी इतर पर्यायांमध्ये होत राहते.
4. शेजारच्या दातांना नुकसान होत नाही
ब्रिजमध्ये शेजारच्या दातांना घासावे लागते, पण इम्प्लांटमध्ये ते सुरक्षित राहतात.
5. खाणे आणि बोलणे सुधारते
कडक पदार्थही सहज चावता येतात आणि स्पष्ट बोलता येते.
6. काढण्याची गरज नाही
डेंचरप्रमाणे इम्प्लांट काढावे लागत नाहीत, ते कायमस्वरूपी बसवलेले असतात.
डेंटल इम्प्लांट्सची किंमत (Dental Implants Cost) कशावरून ठरते?
जेव्हा आपण इम्प्लांटसाठी स्कॅन करतो, तेव्हा त्या स्कॅनच्या आधारे जबड्याच्या हाडाची स्थिती, उपलब्ध जागा आणि आवश्यक आकार यांचे मूल्यांकन केले जाते. त्यानुसार कोणत्या प्रकारचा आणि कोणत्या आकाराचा इम्प्लांट तुमच्यासाठी योग्य ठरेल, हे ठरवले जाते.
इम्प्लांटची किंमत ठरवताना खालील घटक महत्त्वाचे असतात:
· इम्प्लांटचा प्रकार आणि साइज
· वापरल्या जाणाऱ्या इम्प्लांट ब्रँड/कंपनी ( Imported )
· दाताची जागा (समोरचा किंवा मागचा दात)
· हाडाची स्थिती (Bone quality)
काही वेळा हाड कमी असल्यास बोन ग्राफ्टिंग किंवा इतर अतिरिक्त प्रक्रिया करावी लागू शकते, ज्यामुळे खर्च वाढू शकतो.
याशिवाय, इम्प्लांट करणाऱ्या डॉक्टरांचा अनुभव आणि कौशल्य हाही एक महत्त्वाचा घटक आहे, ज्यावर उपचाराची गुणवत्ता आणि किंमत दोन्ही अवलंबून असतात.
डेंटल इम्प्लांट्स किती वर्ष टिकतात?
साधारणपणे पाहिले तर इम्प्लांट जबड्याच्या हाडामध्ये बसवला जातो. हा टायटॅनियम धातूपासून बनवलेला असतो. टायटॅनियम हा अत्यंत मजबूत आणि जैवसुसंगत (biocompatible) धातू आहे, जो आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया निर्माण करत नाही.
हाडामध्ये इम्प्लांट बसवल्यानंतर त्याच्या पृष्ठभागावर एक विशेष टायटॅनियम कोटिंग असते, ज्यामुळे हाड आणि इम्प्लांट यांचे मजबूत जुळण (osseointegration) होते. त्यामुळे हा इम्प्लांट सहज निघत नाही.
मात्र, इम्प्लांट टिकण्यामध्ये काही महत्त्वाचे घटक असतात:
· हाडाची गुणवत्ता (bone quality)
· हाडाची घनता (bone density / consistency)
· तोंडाची स्वच्छता (oral hygiene)
· रुग्णाची सवय (जसे की धूम्रपान, दात घासण्याची पद्धत)
· सामान्य आरोग्य स्थिती (BP, Diabetes)
जर हाड मजबूत आणि घन असेल, तसेच रुग्णाने योग्य काळजी घेतली, तर इम्प्लांट खूप वर्षे—अगदी आयुष्यभरही टिकू शकतो. पण जर हाड कमकुवत असेल किंवा तोंडाची स्वच्छता नीट राखली नाही, तर इम्प्लांट सैल होण्याची किंवा निघण्याची शक्यता वाढते.
तोंडात हिरड्या खालच्या हाडाची झीज केंव्हा होऊ शकते?
जर हाडाला कोणत्याही कारणामुळे सतत त्रास, सूज किंवा इन्फेक्शन होत राहिले, तर त्या भागातील हाड हळूहळू कमी होऊ लागते. विशेषतः जिथे दात काढला आहे आणि तिथे काहीच बसवलेले नाही, अशा ठिकाणी हाडाचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
जर रुग्ण नियमित तपासणी करत नसेल, तोंडाची स्वच्छता राखत नसेल किंवा हिरड्यांचे आजार (gum disease) असतील, तर हाड कमजोर होऊ शकते. यामुळे इम्प्लांट सैल होण्याचा धोका निर्माण होतो.
परंतु, जर योग्य उपचार, नियमित तपासणी आणि तोंडाची स्वच्छता व्यवस्थित ठेवली, तर हाड टिकून राहते आणि इम्प्लांटला कोणतीही अडचण येत नाही.
तर आता ही काळजी घेणं म्हणजे काय?
इम्प्लांटच्या आजूबाजूची हिरडी नेहमी स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्या भागात बॅक्टेरिया साचल्यास सूज किंवा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नियमित आणि योग्य पद्धतीने तोंडाची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन केल्यास इम्प्लांट सुरक्षित राहतो आणि कोणतीही अडचण येत नाही.
इम्प्लांटनंतर आपण रोजचे अन्न सहजपणे खाऊ शकतो. मात्र, अतिशय कडक पदार्थ टाळणे योग्य ठरते. उदाहरणार्थ—चणे, शेंगदाणे, अक्रोड, बदाम यांसारखे पदार्थ खाता येतात; पण अतिशय कठीण, कडक किंवा कवचासकट पदार्थ (अक्रोड कवच्यासकटचा पिस्ता) टाळावेत. यामुळे नैसर्गिक दातांवर तसेच इम्प्लांटवर अनावश्यक ताण येत नाही आणि इम्प्लांट दीर्घकाळ टिकतो.
इम्प्लांटनंतर नियमित फॉलो-अप (check-up) करणे तितकेच महत्त्वाचे आहे. या तपासणीत इम्प्लांटची स्थिती, आजूबाजूचे दात आणि हिरडी यांची तपासणी केली जाते. जर कुठे प्लाक किंवा संसर्गाची सुरुवात दिसली, तर त्वरित उपचार करता येतो. प्लाक म्हणजे बॅक्टेरियांचे थर, जे इम्प्लांटच्या आजूबाजूला साचू शकतात. त्यामुळे नियमित स्वच्छता आणि वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. साधारणपणे सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा तपासणी करणे योग्य ठरते.
योग्य स्वच्छता, नियमित देखभाल आणि वेळेवर तपासणी केल्यास इम्प्लांट दीर्घकाळ टिकतो आणि कार्यक्षम राहतो. कारण इम्प्लांट हा जबड्याच्या हाडामध्ये बसवलेला असल्यामुळे, हाड मजबूत असेपर्यंत इम्प्लांटही स्थिर राहतो.
डेंटल इम्प्लांट vs ब्रिज vs डेंचर
| पर्याय | टिकाऊपणा | आराम | नैसर्गिक लूक | हाडाचे संरक्षण |
| इम्प्लांट | ⭐⭐⭐⭐⭐ | ⭐⭐⭐⭐⭐ | ⭐⭐⭐⭐⭐ | ✔️ |
| ब्रिज | ⭐⭐⭐ | ⭐⭐⭐ | ⭐⭐⭐ | ❌ |
| डेंचर | ⭐⭐ | ⭐⭐ | ⭐⭐ | ❌ |
डेंटल इम्प्लांट प्रक्रिया (Step-by-Step)
· तपासणी आणि एक्स-रे / CBCT स्कॅन
· इम्प्लांट बसविणे (शस्त्रक्रिया)
· बरे होण्याचा कालावधी (३–६ महिने)
· कायमस्वरूपी दात (क्राउन) बसविणे
Smilex मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया सुरक्षित, अचूक आणि शक्य तितकी वेदनारहित पद्धतीने केली जाते.
डेंटल इम्प्लांट कसे केले जाते? संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
Smilex मध्ये इम्प्लांट का करावे?
· ३३+ वर्षांचा अनुभव – डॉ. विजय देशमुख
· अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर
· उच्च दर्जाचे इम्प्लांट मटेरियल
· वैयक्तिक (पर्सनलाइज्ड) ट्रीटमेंट प्लॅन
· हजारो यशस्वी केसेस
· प्रमाणित निर्जंतुकीकरण प्रक्रिया
· अनुभवी डॉक्टरांची टीम
कोणासाठी योग्य आहे डेंटल इम्प्लांट(Dental Implants)?
· एक किंवा अधिक दात गमावलेले असलेले रुग्ण
· पूर्ण दात नसलेले (Full Mouth Implants आवश्यक असलेले) रुग्ण
· डेंचर वापरताना अडचण येणारे रुग्ण
· चांगली तोंडी आरोग्य स्थिती (Oral Health) असलेले रुग्ण
इम्प्लांटनंतर घ्यायची काळजी
· दररोज नीट ब्रश आणि फ्लॉस करणे
· धूम्रपान टाळणे
· नियमित डेंटल तपासणी (Check-up) करणे
· सुरुवातीच्या काळात कडक पदार्थ टाळणे
FAQs – डेंटल इम्प्लांटविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. डेंटल इम्प्लांट दुखतात का?
स्थानिक भूल दिल्यामुळे implant प्रक्रिया जवळजवळ वेदनारहित असते.
2. इम्प्लांट बसवण्यासाठी किती वेळ लागतो?
शस्त्रक्रिया साधारण ३०–६० मिनिटांत पूर्ण होते. मात्र, संपूर्ण प्रक्रिया ३–६ महिने लागू शकते.
3. इम्प्लांट किती वर्षे टिकतात?
योग्य काळजी घेतल्यास इम्प्लांट २०+ वर्षे किंवा आयुष्यभरही टिकू शकतात.
4. डायबेटीस असलेल्या रुग्णांना इम्प्लांट करता येतात का?
होय, पण रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात असणे आवश्यक आहे.
५. इम्प्लांट आणि ब्रिजमध्ये काय फरक आहे?
इम्प्लांट हा जबड्याच्या हाडामध्ये बसवला जातो आणि त्यामुळे शेजारच्या दातांना कोणतेही नुकसान होत नाही. परंतु ब्रिज बसवताना शेजारील दात घासावे लागतात, त्यामुळे त्यांना काही प्रमाणात हानी पोहोचू शकते.
६. इम्प्लांटनंतर काय खावे?
सुरुवातीच्या काळात मऊ आणि सहज पचणारे पदार्थ खाणे योग्य असते. उदाहरणार्थ – खिचडी, दही, सूप इत्यादी.
७. वयाची मर्यादा आहे का?
साधारणपणे १८ वर्षांनंतर कोणत्याही वयात इम्प्लांट करता येतो, जर एकूण आरोग्य स्थिती चांगली असेल तर.
८. रक्त पातळ करणारे औषध घेत असताना इम्प्लांट करता येतात का?
होय इम्प्लांट करण्याच्या 3 ते 5 दिवस आधी रक्तगट करण्याची प्रक्रिया गोळी लाभते. अर्थात हे तुमच्या फॅमिली डॉक्टरची परवानगीने केले जाते
निष्कर्ष
गमावलेल्या दातांसाठी डेंटल इम्प्लांट्स हा सर्वात सुरक्षित, टिकाऊ आणि नैसर्गिक पर्याय आहे. जर तुम्हाला तुमचे स्माइल आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवायचा असेल, तर Smilex Dental Implants and Aligners Centers Pune येथे आजच कन्सल्टेशन बुक करा.
कॉल/WhatsApp: +91 97654 07660